परतवाडा : गुरुकुल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेतील वर्ग दहावी मधील मुलींची क्रिकेट संघ तालुकास्तरावर झालेल्या सामन्यात विजयी होऊन आपली निवड जिल्हा स्तरावर होणाऱ्या सामन्यासाठी निश्चित केली. मुलींच्या क्रिकेट खेळातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोळे, मुख्याध्यापिका राधिका चौधरी,उपमुख्याध्यापिका अनघा भारतीय, क्रीडा शिक्षक उमेश मोहोड,वैष्णवी सावरकर यांनी संघातील सर्व मुलींचे कौतुक करून जिल्हा स्तरावर होणाऱ्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या क्रिकेट सामन्यात वर्ग दहावी मधील गौरी चव्हाण,सिद्धी मिस्त्री,आरोही प्रधान,धनश्री मालखेडे, वैशाली येवले, समृद्धी दाभाडे,समिधा झोड,अनन्या मोरे,अनुजा कपले,समीक्षा कडूकार, महेक खत्री, गौरी कलाने, क्रिष्णा ठाकरे, भक्ती पापडकर, कनक खत्री, समृद्धी गाठे, यांनी आपल्या संघाला विजयी बनवले. विजयी क्रिकेट संघाचे शाळेतील शिक्षक, पालक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतिक करून अभिनंदन केले.