पुणे दि. २० ऑक्तोबर २०२४ रोजी कवी,लेखक, निवेदक, मा. अँड. उमाकांत मधुकर आदमाने (नोटरी, भारत सरकार) विद्या निकेतन (vsvss) सोशल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ संस्थेचे अध्यक्ष / संस्थापक मा. श्री. शशिकांत कोचळे यांनी जाहीर केला.
कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने मूळ गाव बोरगाव काळे, जिल्हा लातूर परंतु सध्या स्थायिक पुणे येथून विविध सामाजिक, शैक्षणिक, व साहित्यिक चळवळीत सक्रीय असे कार्य सतत करत आहेत.
कवी अॅड. उमाकांत मधुकर आदमाने हे सन २००९ पासून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, पुणे येथे वकीली व्यवसाय करीत असून सन २०२० मध्ये त्यांची भारत सरकार नोटरीपदी निवड झालेली असून नोटरी व्यवसाय सुद्धा प्रामाणिक पणे करीत आहेत, वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात साहित्यिक विश्वात यशस्वी प्रवास करत या अगोदर साहित्य क्षेत्रात ९५ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर येथे शांता शेळके कवी कट्टा वर आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती, ९६ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा येथे प्रा. देविदास सोटे कवी कट्टा वर नुसत्या तुझ्या असण्याने, आई या विषयावरील कविता मोठ्या दिमाखात सादर केली होती,
व ९७ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर, जळगाव येथे प्रेमकविता मोठ्या आनंदाने सादर केली. त्यामुळे साहित्यिक क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक जिल्हास्तरीय, राजस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.