बाप्पा निघाले का हो?
तुम्ही आपल्या घरी
ठेवूनी आमच्या डोळ्यात
वाहत्या अश्रूंच्या सरी…..
संपला सोहळा आज
गणेश उत्सवाचा
निरोप द्यायला जमला
समुदाय मानवाचा…..
निरोप देता तुम्हां
डोळे हो पाणवले
बाप्पा तुम्ही तुमच्या
घरला का हो निघाले…
दहा दिवस गेले भुर्रकन
पूजा अर्चा करण्यात
बाप्पा आशिर्वाद द्यावा
सदैव राहू दे तुझ्या चिंतनात….
बाप्पा निरोप देते तुज
पण आहेस तू सदैव मनात
पुजिते मनोभावे तुला
मांगल्य राहू दे घरात……
मंगलमूर्ती मोरया॥
गणपती बाप्पा मोरया ॥
वसुधा नाईक,पुणे