युवा साहित्यिक पाठ्यपुस्तक कवी व महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक मा . सचिन बेंडभर सर यांची सदिच्छा भेट घेणेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडी ता. शिरुर. जि.पुणे या ठिकाणी सरांची भेट घेण्याचा व सरांना पुरस्काराबद्दल अभिनंदन करण्याचा योग आला . या प्रसंगी सरांनी लेखक आपल्या भेटीला हा अभिनव उपक्रम राबवला त्यामुळे मला इयत्ता दुसरी व सहावीच्या मुलांशी हितगुज करण्याची सुवर्ण संधी मिळाली .
मुलांशी हितगुज करताना मीही माझ्या शालेय जिवनात रममान झालो . छोट्या-छोट्या मुलांनी माझी छोटेखाणी मुलाखत घेतली . त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मला माझे शालेय जिवन आठवले . सहावीच्या मुलांना हेलपाटा कादंबरीचे अंतरंग उलगडून सांगीतले तसेत शालेय जिवन हे आयुष्यातील बेस्ट दिवस असतात हे सांगीतले .मुलांशी हितगुज साधुन खुपच छान वाटले . शाळेतील सर्व गुरुजनांनी हेलपाटा कादंबरीचे तोंडभरुन कौतुक केले .
व लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात सामावुन घेतल्याने तो माझ्यासाठी अविस्मर्णीय क्षण होता . शाळेने ही संधी प्राप्त करुन दिल्लाने सर्व गुरुजनांचे आभार मानले . तसेच हा योग सचिन बेंडभर सरांमुळे जुळुन आल्याने व सरांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सरांचे अभिनंदन करण्याची संधी मला मिळाली . माझी पत्नी पुष्पा ही शिक्षिका असल्यानं व ती ही सोबत असल्यानं तिला ही खुप छान वाटले .
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, अरूणा घोडेकर, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.
तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत तुषार सिनलकर, प्रास्ताविक किरण अरगडे तर आभार शाळेचे मुख्याध्यापक विजय गोडसे यांनी मानले.
वाबळेवाडी शाळेच्या या उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख प्रकाश लंघे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे. या वेळी श्री . तानाजी धरणे यांनी त्यांची संघर्षमय , हृदयस्पर्शी हेलपाटा ही कादंबरी शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिली .
तानाजी धरणे
लेखक कादंबरी हेलपाटा
9975370912