शैक्षणिक

एशियन महाविद्यालय पुणे येथे हिंदी दिवस साजरा

पुणे दि.१४ एशियन महाविद्यालय धायरी येथे हिंदी दिवस कला शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. अनिताजी साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, सचिव मा.अनिल साप्ते, प्राचार्या डॉ. सविता सिंह, उपप्राचार्या श्रुती रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेचे विभाग प्रमुख सहा.प्रा.अंकुश जाधव यांनी हिंदी दिवस साजरा केला.

साहित्यिक,कवी,अलककार सहा.प्रा.भारजकर बी.टी.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लाभले.. द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी गौरी देशपांडे, प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी काजल यांनी हिंदी भाषा ही राजभाषा असून ती जगात तिसऱ्या नंबरवर आहे. याचा अभिमान वाटतो असे सांगितले. तसेच प्रमुख अतिथी सहा.प्रा.भारजकर बी.टी.यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा.अंकुश जाधव सर यांनी केले. अतिथीची ओळख सहा.प्राध्यापिका प्राजक्ता देशपांडे यांनी केले व आभार प्रदर्शन सहा.प्राध्यापिका श्रध्दा हिंगणे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Related posts

पवित्रता, जीवन की बनाये रखना यही धम्म है!

kalaranjan news

सन १९७५ मधील दहावी च्या माजी विद्यार्थ्यांकडून मालगुंड विद्यालयास स्मार्ट टीव्ही.ची स्तुत्य देणगी

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बीर्ला कॉलनी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

kalaranjan news