गुरुकुल पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स परतवाडा येथे हिंदी दिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोळे सर यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका सौ. राधिका चौधरी व उप मुख्याध्यापिका सौ. अनघा भारतीय यांच्या नेतृत्वात कार्यक्रम सपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सौ. शीतल यादव, कु. आरती तायडे यांची विशेष उपस्तिथी होती.प्रस्तुत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, भाषणे,नृत्य सादर केली.कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख अतिथीनी आपल्या कवितेतुन हिंदी भाषेचे महत्व स्पष्ट केले
तसेच शाळेच्या उप मुख्याधपिका सौ. अनघा भारतीय यांनी आपल्या सुमधुर गायनाने शालेय वातावरण प्रफुल्लित केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. राधिका चौधरी यांनी आपल्या भाषनातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थीकु . कृष्णा ढाकुलकर, कु. ट्विंकल काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु याशिका कोल्लापुरे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेतील शिक्षिका कु. आरती तायडे,कु. प्रतीक्षा लिखितकर, सौ. वैशाली पाटील,सौ. शीतल देशपांडे, सौ. अनुराधा रावळकर यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते