अमडापुर-(प्रतिनिधी ) – मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचा लाडका कलाकार शुभम गणेश चिंचोले याने पुण्यामधील “पेरू गेट मित्र मंडळ ट्रस्ट, सदाशिव पेठ, पुणे” गणेशोत्सव मध्ये साकारतोय अखंड हिंदुस्तानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका. खूप कलाकारांचे स्वप्न असतं की त्यांच्या जीवनात एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारता यावी व तसेच उत्तम प्रकारे साकारता सुद्धा यावी, “वाघनखं” या जिवंत देखाव्या मधून तो महाराष्ट्र वासियांचे मन जिंकतोय, तो म्हणजेच आपल्या चिखलीचा कलाकार शुभम गणेश चिंचोले.
चिखलीकर असल्याचा अभिमान आहे की आपल्या गावातील गरीब कुटुंबातील हा तरुण स्वतःच्या उरात स्वप्न बाळगून धडपड करतोय. सध्या त्याचं रंगभूमी वरती १) वाघनख एक आक्रमक शिवनाट्य, २) श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक हे प्रमुख व्यावसायिक नाटकाचे प्रयोग यशस्वीरित्या सुरू आहे तसेच सोशल मीडिया वरती Influencer म्हणून त्याचा लाखोचा चाहता वर्ग आहे .
आतापर्यंत बऱ्याच सिरीयल मध्ये जसे ( योग योगेश्वर जय शंकर, ज्ञानेश्वर माऊली, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, जय भवानी जय शिवाजी, स्वराज्य जननी जिजामाता, डॉक्टर डॉन, नवनाथांची गाथा) नाटकांमधून (उलगुलान, फॉरेन चा नवरा, भूक) तर लघुचित्रपटांमधून (तो कोण होता?, मी आहे सतर्क, आत्महत्या हा पर्याय नाही, टेलर) त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या जगात त्याचे खूप चाहते आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात त्याचे समाज प्रबोधनात्मक संदेश लोकांना एक प्रेरणा देता एक वेगळी ऊर्जा देत आहे. (युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक असे सर्व मिळून) त्याचे जवळपास ८ मिलियन म्हणजेच (८० लाख) फॉलोवर्स आहेत. या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यासाठी एक खूप अभिमानास्पद बाब आहे.
घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असताना सुद्धा… घरच्यांनी त्याला प्रोत्साहन दिल… याचा संपूर्ण श्रेय तो त्याच्या आई-वडिलांना देतो . आपल्या गावातून अशा कलाकारांना प्रोत्साहन मिळणं ही एक खूप महत्त्वाची बाब आहे जेणेकरून आपल्या गावाचं नाव उच्च पातळीवर गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणुन समस्त चिखलीकराकडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!