रामदास अवचर सुपे, ता.कर्जत, जि. अहमदनगर.
संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शहर म्हणून ओळखल जात. सतत धड धडणारी यंत्र यंत्राच्या चाका बरोबर चालणारी माणसं फुरसत अशी नाहीच. तरी ही धड धडणाऱ्या यंत्राबरोबरच पिंपरी चिंचवड करांची संवेदनशीलता ही वाखान्याजोगी आहे . कारण पिंपरी चिंचवड शहर हे कवितेची राजधानी म्हणून ही आता ओळखल जावू लागल आहे. तस पाहिल तर कवी हा उपेक्षितच असतो आणि त्यात नवोदित म्हटलं तर विचारायलाच नको. योग्यता असून ही व्यासपीठा अभावी किंवा संधी अभावी तो कुठेतरी कोपऱ्यातच राहतो.
परंतु “कवी हा जगताचा धनी”हे ब्रीद घेऊन प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी नक्षत्राचं देणं काव्य मंच या संस्थेची २५ वर्षापूर्वी स्थापना केली. आणि त्यांच्या चिकाटी वृत्तीमुळे व जिद्दी वृत्ती मुळे संस्थेच्या या इवलेशा रोपट्याचे आता डेरेदार वृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले.अनेक कवी संमेलने भरविली गेली,अनेक काव्य मैफली घेतल्या गेल्या. मग त्यात प्रेम काव्य मैफल असो, वासंतिक काव्य मैफल असो, किंवा पाऊस या विषयावरची श्रावणी काव्य मैफल असो असे कितीतरी वेगवेगळे विषय घेऊन ते पार पाडले गेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा या स्पर्धेने तर ही संस्था राज्याच्या गावागावात व घराघरात पोहोचली. ही स्पर्धा म्हणजे उत्तमात उत्तम कवी घडविण्याचे विद्यापीठच म्हणावे लागेल.
संस्थेसाठी अशा ध्येयाने झपाटलेल्या व काव्याला वाहून घेतलेल्या ध्येय वेड्याबद्दल थोडस… मराठी साहित्य समृद्ध करण्याचे व मराठीला सर्वोच्च शिखरावर नेहण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी केले. तसेच नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ही महाराष्ट्रात अनेक साहित्यिकांनी केले की ज्यांच्यामुळे मराठीचा व मराठी भाषेचा उर अभिमानाने भरून यावा. आणि त्यातीलच एक व्यक्ती महत्त्व म्हणजे राजेंद्र सोनवणे सर की ज्यांनी नक्षत्राचं देणं काव्य मंच या संस्थेची स्थापना २५ वर्षांपूर्वी केली. राजेंद्र सोनवणे हे एक अस आगळ वेगळ व्यक्तिमत्त्व आहे की जे सतत झपाटल्यासारखं (भुताने नव्हे बरे का ? ध्ययाने )काम करत ते ही रात्रीचा दिवस करून.
तसा त्यांचा आणि माझा जास्त दिवसाचा परिचय नाही. सन२०२२ मध्ये राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेसाठी मी एक कविता पाठवली होती आणि ती कविता पारितोषकास पात्र ठरली तेव्हापासून माझे या संस्थेशी व राजेंद्र सोनवणे सरांशी घनिष्ठ सबंध निर्माण झाले. फक्त तीन वर्षाचा काळ पण या तीन वर्षात तीन पिढ्यांचे ऋणानुबंध असावेत अस वाटत. पुढे संस्थेच्या बऱ्याच उपक्रमात सहभागी होण्याचा योग आला आणि त्यात मला जो आपुलकीचा अनुभव आला त्याचं वर्णन किती ही केलं तरी ते कमीच पडेल. खरंतर सरांसारखा ध्येय वेडा, झपाटलेला माणूसच मी आज पर्यंत पाहिलेला नाही. निस्वार्थीपणाने ते जे काही करतात त्याला तर तोडच नाही. मी अनेक वेडी माणसं पाहिलेली आहेत माणूस वेडा असतो पण इतका वेडा की वेडेपणात तो स्वतःलाच विसरून जातो. त्यांचा सरळ मार्गी स्वभाव व स्पष्ट वक्तेपणा खरंच मनाला भावून जातो. ते एखाद्या कार्यात स्वतःला एवढे झोकून देतात की त्यांना सरळ व्हायला वेळच मिळत नाही. हे मी स्वतः डोळ्यांनी अनुभवले आहे.
खरंतर ते एक उत्तम कवी,उत्तम लेखक, उत्तम संघटक,उत्तम नियोजक व उत्तम कार्य कुशलता असणार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी साहित्याचं खत पाणी घालून मोठे केलेल्या वृक्ष छायेचा माझ्या सारखे कितीतरी लोक आनंद व उपभोग घेत आहेत. आणि त्यामुळेच संस्थेची व सोनवणे सरांची ख्याती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर व देशाबाहेर ही सुगंधासारखी पसरली गेली आहे. महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील नवोदित कवी कवयित्रींना फुलविण्याच व त्यांच्या मनातील काव्य फुलांच्या बियांना रूजविण्याच काम सोनवणे सरांनी केलेले आहे. त्यांना व्यासपीठ मिळवून देऊन योग्य तो सन्मान देण्याचे काम सरांनी व संस्थेने वेळो वेळी केलेले आहे. व आजही ते करत आहेत.
त्यांच्या संकल्पनेतून हजारो असे स्तुत्य कार्यक्रम राबविले गेले आहेत. कवींच्या कॅलेंडरा सह कवी सहल व अनेक पुस्तकांचे प्रकाशन ही त्यांनी केलेलं आहे . त्यात माझ्या ही दोन-चार पुस्तकांचा समावेश आहे. असे सर्व समावेशक असणारे सोनवणे सर यांनी स्थापन केलेली “नक्षत्राच देण काव्य मंच”ही संस्था आज रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त या संस्थेला व संस्थापकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
संस्था रौप्यच काय पण हिरक, अमृत व शतक महोत्सव साजरा करो हीच प्रमाणिक व मनापासून इच्छा…!
सरांनी स्थापन केलेला संस्थेला व त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या कवींना त्यांनी ” नक्षत्र’ ही उपाधी दिलेली आहे. त्या नक्षत्राच्या राजाला म्हणजे सरांना व संस्थेला माझ्याकडून कवितेतून ही शुभेच्छा…!
” नक्षत्राचा राजा “
———————–
नक्षत्राचा एकच राजा
कवी वादळ कार…
सुगंधापरी पसरे जायाची
ख्याती महाराष्ट्रभर…
जयाचे संकल्पे जन्मा आल
नक्षत्राचं देणं…
कथा कविता मराठमोळ्या
साहित्याच लेण…
नवोदितांना करून दिलं
व्यासपीठ ते खुल…
भल्या भल्यांना पडते येथे
कवितेची ती भूल…
बघता बघता संस्था आमुची
पंचवीशी मध्ये आली…
भर तारुण्याचा माहुल सारा
गाजविल्या मैफली…
कथा कविता चारोळ्या त्या
भिजले रसिक ते अंतरी…
शब्दा शब्दाने अवतरली येथे
साहित्य पंढरी…
कुणी न केले इतुके सारे
मनावर घेऊनी…
“राजेंद्रची”तळमळ पाहता
चित्त जाते भारावूनी…!
———————————