कला पुरस्कार

गीतकार भारत कवितके यांची संगीत रत्न पुरस्कार २०२४ करीता निवड.

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
मुंबई कांदिवली पश्चिम येथील गीतकार पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांची राष्ट्रीय लोकराज्य न्यूज कडून राज्य स्तरीय संगीत रत्न २०२४ २५ करीता निवड झाल्याचे संपादक राहुल कुदनर यांनी भारत कवितके यांना निवड पत्रा व्दारा कळविले आहे.गीतकार भारत कवितके यांनी गाण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.युट्यूबवर आता पर्यंत भारत कवितके यांची पाच गाणी प्रसारित झाली

आहेत.पाच ही गाण्यांना रसिकां कडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.विशेष करुन ” राणी सांजवेळी” व”आठव आठव राणी” ही दोन प्रेम गीते तरुण तरुणी तोंडी रेंगाळत आहे.तसेच बापू विरु वाटेगावकर अमर झाला,आज विठू तुझ्या पंढरीत मी आलो, लोकमाता अहिल्याबाई होळकरांना स्मरतो,अशी गाणी युट्यूबवर वर लोकप्रिय झाली आहेत.गीतकार म्हणून भारत कवितके यांना या पूर्वी कला रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी एस फोर जी हाँटेल , थेऊर फाटा, पुणे सोलापूर रोड, येथे सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.संगीत रत्न पुरस्कारासाठी भारत कवितके यांची निवड झाल्याबद्दल समाजाच्या विविध थरातून भारत कवितके यांचेवर अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related posts

वृद्ध कलावंत निवड समितीची रचना बदलली

kalaranjan news

“कला रंजन न्यूज” वर्धापन दिन सोहळा समाजसेवेतील नायकांचा गौरव

kalaranjan news

मुरबाडचा मिमिक्री स्टार गणेश देसले गाजतोय महाराष्ट्रभर

kalaranjan news