कला कविता काव्य पुरस्कार

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार

आरमोरी गडचिरोलीअज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा शिक्षक’ या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार आरमोरी गडचिरोली तर्फे वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.त्यात फोंडा गोवा रहिवासी,एकमेव गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्य चे संस्थापक) यांनी पण साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडुन आनंद व्यक्त करित अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा नामवंत पुरस्कार प्राप्त केलेल्यात गोव्यासहीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यातील साहित्यिकांचा समावेश आहे.

सौ.शोभा कोठावदे, मुंबई ,नीरज आत्राम,चंद्रपूर,नम्रता खरे, मुंबई,शिवाजी सावंत, पुणे,कोठेकर योगिता संजय, पुणे,संगीता जामगे,डॉ.सौ.मीनाक्षी निळेकर,बीड,स्मिता भीमनवार, पुणे,लीलाधर दवंडे, कामठी सौ.तृप्ती भंडारे,नालासोपारा,सौ.सारिका लाठकर, नांदेड,वैशाली बोरसे, धुळे,सरोजनी करजगीकर, परभणी,गणेश निकम, चाळीसगाव,सौ.वंदना चौधरी, गुजरात,सौ.नंदिनी शरद गलांडे,महेंद्र कोल्हटकर ,डॉ आर. पी. गावडे,सौ.शोभा प्रकाश कोठावदे,ओंकार राठोड,संगिता घोडेस्वार,केशव डफरे,सुमनताई मुठे,पद्माकर वाघरूळकर,अशोक महादेव मोहिते,श्री वासुदेव सोनटक्के,संदीप भुक्कन पाटील, गवाजी बी बळीद सौ.सुनिता अशोकराव आकनुरवार,प्रा.मन्नाडे रमा धनराज,रज्जाकशेख,अशोककुमार डी शिंदे सुजाता उके,नागपूर,संगीताताई भाऊसाहेब जामगे,गिरीश राधाकृष्ण भट,खेमदेव हस्ते,नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा-गोवा),उमेश बाऱ्हाटे,सौ. साधना सुरेश ब्राह्मणकार आणि सुनंदा अंभोरे, औरंगाबाद अशा तब्बल ४० साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.सर्व साहित्यिक कवि कवयत्रिंचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Related posts

श्रावण सर मराठी कविता

kalaranjan news

मुधोजी बालक मंदिर, फलटण या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

kalaranjan news

सौ.शारदा विनोद दातीर यांच्या आदिवासी समाज विकासाचा आढावा

kalaranjan news