पुरस्कार

शलाका गाडगीळ यांना यही है आशा पुरस्कार प्रदान !

पुणे : 8 सप्टेंबर 2024 ज्येष्ठ गायिका सौ.शलाका गाडगीळ यांना नुकताच, मधुरंग संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे गायक आणि शीळवादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते

‘ यही है आशा ‘ पुरस्काराने जाहिररित्या सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्ष सौ.वसुधा नाईक, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे, ज्येष्ठ साहित्यिक रविन्द्र गाडगीळ, संगीत कलावंत मुकुंद जोशी, अनुजा पंडित आदि मान्यवर उपस्थित होते. आशा भोसले यांच्या 91व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

आपल्या सुमधूर आवाजातून सुंदर जुनी गीते सादर करुन गेली 5 दशकं शलाका गाडगीळ सादर करुन रसिकांमधील दुर्दम्य आशावाद वृध्दिंगत करीत आहेत , हे योगदान निश्चितच गौरवास्पद आहे ” असे प्रतिपादन पुरस्कार प्रदान करताना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले . याच सोहळ्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाचा 566वा विश्वविक्रमी अंकही प्रकाशित करण्यात आला. कवयित्री वसुधा नाईक यांनी काव्यवाचन सादर केले.

पुरस्कार विषयी कृतज्ञता व्यक्त करुन शलाका गाडगीळ यांनी ‘ मै हूॅ आशा ‘ हा आशा भोसले यांच्या जुन्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम सादर केला आणि रसिकांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. हृदयी प्रित जागते, तुझ्या गळा माझ्या गळ्या, देव जरी मज कधी भेटला,मी पाहू कशाला नभाकडे, ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर आदि आशा भोसले यांची गाजलेली भावगीते शलाका गाडगीळ यांनी रसिकांना जुन्या भावगीतांच्या सुवर्णयुगात नेले. आशा भोसले , लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, नूरजहाॅ गीता दत्त, सुरैय्या , नूरजहाॅ सुधा मल्होत्रा, शांति माथुर आदि गेल्या शतकावर प्रभाव टाकणा-या 9 गायिकांच्या गाण्यांवर आधारीत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी विश्वविक्रमी ‘ गायिकांची गाणी ‘ सादर केली. ही गाणी
सादर करताना गायिकांच्या कुंडल्या, सह्या , भाग्यांक याच्या आधारे किस्सेही सांगून रसिकांचे मनमुराद मनोरंजन केले.

सारिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.अनुजा पंडित यांनी स्वागत गीत आणि भैरवी सादर केली.रविन्द्र गाडगीळ यांनी आभारप्रदर्शन केले. अश्विनी कुलकर्णी, सविता भोसले आदिंनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शलाका आहे गायिका आहे ती आशा उद्याची गायनाचे धडे देते मुलींना लाडकी आहे सर्वांची….

Related posts

विरार येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी 

kalaranjan news

नाशिक येथे अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडीत यांना कलावंत पुरस्काराने सन्मानित

kalaranjan news

मुंबईतील राहुल डान्स अकॅडमीला यश

kalaranjan news