गुरुकुल पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, परतवाडा या शाळेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र गोळे, मुख्याध्यापिका सौ. राधिका चौधरी, उपमुख्याध्यापिका सौ. अनघा भारतीय यांच्या उपस्थितीत विधिवत गणेश स्थापना करण्यात आली.
दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये प्रत्येक वर्गासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये मोदक सजावट, फुलांची रांगोळी, कलश सजावट, पूजा थाळी सजावट, तोरण बनविणे, घेण्यात आले.पर्यावरण पूरक गणपती हा विषय विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून गणेश स्थापना करण्यात आली.
गणेश स्थापना करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.