भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
धनगर समाजातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियानी धनगर समाजाच्या पंढरपूर मधील शेकडो धनगर समाज बांधवांच्या राज्य व्यापी आमरण उपोषणाचा प्रसार व प्रचार करावा असे आवाहन मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजाचे पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी केले आहे.
संविधानात धनगर समाजाचे एसटी आरक्षण समाविष्ट असताना देखील आज वर सत्तेवर असलेल्या जवळ जवळ सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केले.पण आता मात्र एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता धनगर समाज पुन्हा एकवटला आहे.9 सप्टेंबर सोमवार पासून सामूहिक पणे शेकडो धनगर समाज बांधव (मल्हार यौध्दे) राज्य व्यापी आमरण उपोषणाला बसणार आहेत.धनगर समाजातील प्रसार माध्यमांनी मात्र या बाबतीत पाहिजे तेवढा प्रसार व प्रचार केलेला दिसून येत नाही.समाजाच्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियावर संपादक, पत्रकार, प्रतिनिधी कार्यरत आहेत.परंतु पंढरपूर येथील राज्य व्यापी आमरण उपोषणाच्या बातम्या पाहिजे तेवढ्या प्रसिद्ध झाल्या नसल्याने महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधव या बाबतीत अजूनही जागृत नाही.या उपोषण आंदोलनाची कल्पना समाज बांधवां पर्यंत पोहोचली नाही.या बाबत धनगर समाजातील संपादक पत्रकार यांनी आप आपल्या परीने प्रसार व प्रचार करावा असे आवाहन धनगर समाजातील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांनी केले आहे.ना नेता ना पक्ष, आरक्षण हेच लक्ष, जुनेच काम नव्या दमाने करायचे या उद्देशाने सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांनी पंढरपूर येथे राज्य व्यापी आमरण उपोषण आयोजित केले आहे.