अकोला – बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे पर्यावरणाचे भान राखत शालेय विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात शाळेचे कला शिक्षक योगेश विखे यांनी आंतरशालेय गणेश आयोजन व नियोजन केले होते.
या स्पर्धेत भारत विद्यालय, बाल शिवाजी,स्कुल ऑफ स्कॉलर्स कौलखेड, स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनी,पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट अशा मूर्त्या साकारल्या. या स्पर्धेच्या अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्यध्यापीका डॉ.श्वेता दिक्षित उपस्थित होत्या तसेच सदर स्पर्धेचे निरिक्षक म्हणून योगेश विखे यांनी कामगिरी पार पाडली. या स्पर्धेत गट अ मधून बाल शिवाजीचा आराध्य बोडसेने प्रथम क्रमांक पटकावला तर स्कुल ऑफ स्कॉलर्स कौलखेडचा श्रीजय कालपांडे हा द्वितीय विजेता ठरला
तसेच गट ब मधून बाल शिवाजीचा वेदांत कुटे प्रथम, भारत विद्यालयाची जान्हवी सुरका द्वितीय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची संस्कृती बकाल तृतीय विजेते ठरले तर प्रोत्साहनपर बक्षीस आराध्या इंगळेला देण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमेरा अर्शीन यांनी केले .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास चंदा जोसेफ, दिपीका गावंडे, क्रिडा विभाग प्रमुख स्वप्नील अंभोरे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत.