कविता शैक्षणिकगुरु माऊली मराठी कविता शिक्षक दिनानिमित्त आवर्जून वाचा by kalaranjan news05/09/202446 Share0 गुरु माऊली जनांसाठी धावली भक्ता पावली गुरु माऊली अलौकिक रे प्रज्ञा देतसे आज्ञा गुरु माऊली ज्ञानाचा हा सागर करुणा कर गुरु माऊली पवित्र गंगा जळ पामरा बळ गुरु माऊली ही सत्य नीती धर्म जीवन मर्म गुरु माऊली दीनांची हो सावली मना भावली गुरु माऊली सोडवी रे संसार करी उध्दार कवी संजय मुकूंदराव निकम, गायत्री नगर, कॅम्प, मालेगाव, जि. नाशिक मो. नं. 8657488426