कला कविता शैक्षणिक

गुरुकुल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स परतवाडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

 परतवाडा प्रतिनिधी : गुरुकुल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स परतवाडा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने 5 सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री रविंद्र गोळे सर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या मनोगत मधून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम बनवणारा घटक म्हणजे शिक्षक असे उदगार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ राधिका चौधरी मॅडम यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अनघा भारतीय मॅडम शाळेतील शिक्षक सरफराज खान सर, सौ.माधुरी कोल्हे मॅडम आदी उपस्थित होते.


शाळेच्या एक दिवसीय विद्यार्थी मुख्याध्यापिका कु. राधिका हाते, उपमुख्याध्यापिका कु सौम्या बंड तर शालेय प्रशासन अधिकारी म्हणून आदित्य निचत, प्रायमरी विभाग प्रमुख कु. सिद्धी मिस्त्री,प्री प्रायमरी विभाग प्रमुख कु.आर्या रायकुवार या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या आपली भूमिका पार पाडली. कु. सोनल चांडक व कु.धनश्री मालखेडे यांनी उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अभ्यासपूर्ण आपली मनोगते व्यक्त केली.विद्यार्थ्यांनी सुप्त कलागुणांना वाव देत कविता,गीत,नाटिका तसेच भाषणातून शिक्षकाचे महत्व व्यक्त करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले सौ.राधिका चौधरी मॅडम यांनी आपले अध्यक्ष भाषणामधून शिक्षकांना मार्गदर्शन केले तर कु. श्रावणी भुजबळ हिने आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. दुपारच्या सत्रामध्ये वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेत विषय व वर्गनिहाय तासिका नियोजन करून अध्यापन केले आणि उत्कृष्टरित्या स्वयं शासनाचा कार्यक्रम राबवला तसेच शिक्षकांसाठी संगीत खुर्ची,गीत गायन,इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता श्री.नरेंद्र भेले सर, श्री विनय मगरदे सर ,श्री. अजय वाजगे सर,श्री.उमेश भीमटे सर,सौ.वैशाली पाटील मॅडम,सौ. शुभांगी वानखडे मॅडम, कु. प्रतिक्षा लिखितकर मॅडम,कु.योगिता गुप्ता मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related posts

गुरुकुल पब्लिक स्कूलच्या मुलींची क्रिकेट या खेळात जिल्हास्तरावर भरारी

kalaranjan news

डॉ. शांताराम डफळ यांना राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार प्रदान 

kalaranjan news

प्रसिध्द लेखिका प्रा.दीपाली सोसे यांची तिसर्‍या राज्यस्तरीय मनमंथन मराठी साहित्य संमेलनाच्या ‘संमेलनाध्यक्ष’पदी निवड

kalaranjan news