रविवार दिनांक ०१.०९.२०२४ यादिवशी महाराष्ट्र आर्य वैश्य समाज मुंबईतर्फे वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र आर्य वैश्य भवनच्या सा.कृ.यमसनवार सभागृह से ३०,भैय्यासाहेब बोंगिरवार भवन ,सानपाडा,नवी मुंबई येथे करण्यात आले होते.सकाळी 8 वाजता सत्यनारायण पूजेपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली,पूजेचे यजमान श्री अतुल व सौ प्राची कवटिकवार या दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न झाली. सकाळी ११ वाजता श्री प्रमोद बोंगिरवारजी यांच्या अध्यक्षतेखाली वासवी मातेची आरती,तसेच दीपप्रज्वलन करून,व या वर्षातील कैलासवासी बंधू भगिनींना श्रद्धांजली अर्पण करून वार्षिक सभेला सुरुवात झाली.सचिव केदार नळदकर यांनी प्रास्ताविक प्रस्तुत केले तसेच गेल्या वर्षातील झालेल्या व आगामी वर्षातील होणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली,त्याला सभेतील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.यानंतर खजिनदार श्री.सचिन बोकीलवार यांनी गत व पुढील वर्षातील जमाखर्चाचा लेखाजोखा मोजक्या शब्दांत मांडला.
महाराष्ट्र आर्य वैश्य समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींनी स्वकर्तुत्वाने आपापल्या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे,अशा चार सन्माननीय व्यक्तींचा यावर्षी वेगवेगळ्या उपाधी देऊन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मा. श्री प्रमोद बोंगिरवार, मा.श्री विवेक भीमनवार, डॉ.प्रशांत मोरलवार,ज्योती यमसनवार,श्री. रवींद्र माडुरवार या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कारांच्या या यादीत समाजभूषण डॉ.श्री विवेक पोलशेट्टीवार, समाजभूषण-श्री प्रमोद बोंगिरवारजी समाजगौरव- श्री विजय बुक्कावारजी समाजसन्मान -सौ सुचित्रा अशोक कुंचमवार या चौघांना वरील उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले,दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम समाजातर्फे राबवण्यात येतो.समाजाचे आधारस्तंभ मा.श्री भरतकाका यमसनवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्कार सोहळ्याची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली होती,त्यासाठी यांची मोलाची मदत मिळाली.
समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेत 75% पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत बक्षीस पाकीट देऊन सत्कार करण्यात आला.व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. समाजभूषण डॉ विवेक पोलशेट्टीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व समाजबांधवांना त्यांनी कार्य करत असलेल्या उपक्रमाविषयी प्रोजेक्टरवर चित्रफीत दाखवून माहिती समजावून सांगितली व मुलांनी विज्ञानाची आवड असेल तर नक्की संशोधन क्षेत्रात येऊन संशोधन करण्याची संधी प्राप्त करण्याचे आवाहन केले,तसेच यासाठी जी मदत लागेल ती करण्याची इच्छा दर्शवली.
याच कार्यक्रमात श्री विजय बुक्कावार यांनी लिहिलेल्या ‘चिरंजीव भारत’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले,त्यांनी देखील चित्रफितीद्वारे या पुस्तकाची निर्मिती कशी झाली हे विषद केले.या पुस्तकातून जुना इतिहास पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळेल,यासाठी हे पुस्तक नक्की संग्रही असावे असे मनोगत व्यक्त केले.
समाजभूषण श्री माननीय प्रमोद बोंगिरवार हे ज्येष्ठ नागरिक असूनही प्रत्येक सामाजिक, उपक्रमात हिरिरीने सहभाग असतो हे आवर्जून नमूद केले.विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवलेल्या समाजसन्मान सौ सुचित्रा कुंचमवारचे देखील मान्यवरांनी कौतुक स्वागत केले व श्री विवेक भीमनवार यांनी सर्व सन्मानकर्त्याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,आपले कर्तृत्व अधोरेखित करणारे मानपत्र,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचा हातभार लावला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी काप्रतवार व व्यंकटेश बंडेवार यांनी केले. भवनमधील कर्मचारी शंकर रमण,भिंगार्डे,जगताप,आकाश,यांची मदत मिळाली,सभा झाल्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.यानंतर श्री श्यामसुंदर यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्ष डॉ.श्री प्रशांत मोरलवार यांनी आभारप्रदर्शन केले व या भरगच्च कार्यक्रमाची खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने सांगता झाली.