जग त्याच सुंदर असतं
चिमुकल्या फुलांनी गजबजलेलं
प्रश्नोत्तरांनी सजलेलं
देशाच्या भविष्यात गुंतलेलं
आदराचं,पवित्र असं त्याच पद
निरागस,निष्पाप, निर्मळ
भावनेच ते एक जग असतं
ज्ञानमंदीरात त्याच वास्तव्य असतं
ज्ञानदानाचं अविरत कार्य तो करतो
विद्यार्थ्यांसाठी तो झटतो
भाव प्रगतीचा शिष्याच्या मनात जागवतो
एक अख्खा समाज तो घडवतो
शिक्षक आयुष्याचा निर्माता आहे
तो समाजाचा आरसा आहे
तो विद्यार्थ्याचा एक आदर्श आहे
शिक्षक हा ज्ञानमंदीराचा पुजारी आहे
व्हाव मनाने हाडाने शिक्षक
राखावे पावित्र्य या पेशाचे
करावे सदैव कार्य नेक
धडे द्यावे समाजास आदर्शाचे
कवी – गजानन दशरथ पोटे
अकोला
9923208775