पुनावळे, चिंचवड- नव चैतन्याच्या मंडळाचे श्रावणा निमित्त भजन झाले .मंडळाच्या मुख्य माननीय माधुरी ओक , सभासद सदस्य सगळ्यांनी भजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.माननीय सीमा मुळे यांनी उत्तम सूत्र संचालन केले . प्रथम नमन तुज एकदंता, रंगी रसाळ तुझिया कथा, श्रीगणेश शंकरसुत गौरीनंदना,आम्हा तू यश द्यावे हीच प्रार्थना, यावे गजवदना यावे ,भजनी माझ्या रंगावे, येई अंबे भजनाला धावून ये, मुझे अपनी शरणमें ले लो राम लोचन मनमें जगह न हो तो जुगल चरणमें ले लो राम भाद्रपद मास शुद्ध चतुर्थी धन्य भक्तगण आनंदात नाचतील,रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरूदेव दत्त वृंदावनी जाऊ या ना सखे ग सखे ग वृंदावनी जाऊ या ना कान्हाला पाहू या ना, पाहू द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळा माझ्या अशी विविध भजने ताला सुरात गायली. त्याला उपस्थित रसिकांनी देखील उत्स्फूर्त दाद दिली .
मा.अनुराधा ताईंनी जोगवा सादर केला. अनिका पिकॅडिलीच्या महिला मंडळ सदस्या, सगळ्या़ंच्या आग्रहाखातर सौ.माधुरी यांनी “मी किती सांगु मी कुणाला आज आनंदी आनंद झाला” हे गीत गायले. सर्व उपस्थित मैत्रीणींना आनंद झाला. “आमच्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय सायंकाळ आहे . आमच्या कुटुंबाला शुभेच्छा, देत आशिर्वाद ही दिले, “असे सौ. माधुरी यांनी मत व्यक्त केले.
अरुणा ताई ,भिसे आजी, विनीता ताई ,अंजु ताई , अनघा ताई ,अलकाताई वेळात वेळ काढून आल्या. केळकरताई, शिवाय आपला बिझनेस सोडुन आवर्जुन उपस्थित राहिलेल्या ममीली दुकानाच्या मालकीण मीनल ढेरे, कविता बिराजदार ताई, रेश्मीताई सगळ्या आमच्या कुटुंबाला प्रेमळपणे साथ देताना आज अनिका पिकाडेलीच्या मैत्रीणीना अनुभवता आले.त्यांनीही उतम साथ दिली. समवयीन व तरुण मैत्रीणी नी दिलेली साथ अवर्णनीय आहे.
सौ. पुजा व डॉक्टर साईप्रसाद कुमठेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उभयतांनी मनापासून मेहनत घेतली. हेही या निमित्ताने मैत्रीणींना अनुभवता आले. उत्तम योगायोग म्हणजे आज बाबुजी ना प्रभू श्रीरामाची प्रतिमा त्यांच्या दौंड येथील शालेय बाल मित्रांनी, डॉक्टर धीरेंद्र मोहन (केडगाव),निलीमा शिकारखाने (संपादिका),बच्चू परमार, नामदेव गाडीलकर (शिक्षण संस्था अहमदनगर), किशोर गायकैवारी,नरेश तारे या संयोजक मित्रांनी स्नेह संमेलनाची आठवण म्हणून सस्नेह भेट दिली होती. कार्यक्रम संपण्यापूर्वीच सुंदर श्रीराम मूर्ती आल्याने ती स्थापित करण्यात आली.