• प्रेमाची, मैत्रीची मिसाल उलगडणार
• सोलापूरच्या संभाजी जाधव यांनी सहदिग्दर्शक म्हणून केले काम
सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट’ प्रस्तुत रघु ३५० हा मराठी चित्रपट शुक्रवार दि. ६ सप्टेंबरपासून म हाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक आशिष मडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मारामारी, ऍक्शन, न्यायासाठीची लढाई आणि मिळणार यश हे सारं मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. रघु ३५० या चित्रपटाच्या २.३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. प्रेमासाठी, सत्तेसाठीची ही लढाई पाहायला मिळत आहे. चिन्मय उदगीरकर, विजय गीते आणि अदिती कांबळे यांचा लव्ह ट्रॅगल उत्सुकता वाढवत आहे. नेमक कोणी कोणावर मात करत विजय मिळवला, सत्तेसाठी कोण बदललं, कोणाचा विजय झाला याची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहणं रंजक ठरत आहे. समोर आलेल्या या ट्रेलरमधील तुफान राड्यांवरुन प्रेमाची, मैत्रीची कोणती मिसाल
उलगडणार आहे. ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निमति संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच सोलापूरच्या संभाजी जाधव यांचे सहदिग्दर्शक म्हणून सहकार्य लाभले. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर, विजय गीते, अदिती कामले, तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, रामभाऊ जगताप ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.
करण तांदळे यांनी चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी पेलवली आहे. तर चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. कार्यकारी निर्माता म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे. या पत्रकार परिषदेस चिन्मय उदगीरकर, विजय गीते, संभाजी जाधव, अदिती कामले, तानाजी गलगुंडे, संजय खापरे, शिवराज वाळवेकर, मिलिंद दास्ताने, रोहित आवळे, महिमा वाघमोडे, भरत शिंदे, राम जगताप, संतोष भोसले आदी उपस्थित होते. 350