कला पुरस्कार सांस्कृतिक

तरुण रंगकर्मी प्रशांत निगडे यांना मानाचा सन्मान

नवी मुंबईकर रमले नाटय संमेलनात

ऐरोली, नवी मुंबईतील ‘प्रशांत निगडे’ हे नाव कलाक्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहिलेले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ ह्या मालिकेतून ‘बबन दादा’ या भूमिकेतून प्रशांत निगडे हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहचले. त्यांचा ‘शून्य मिनटात’ हा संवाद प्रचंड लोकप्रिय ठरला. अनेक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती करून त्यात स्वतः प्रमुख भूमिका निभावत अनेक मानाच्या स्पर्धामध्ये त्यांनी सातत्याने बाजी मारलेली आहे. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळवत त्यांनी नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे.

सद्यस्थितीत त्यांचे शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित ‘आय.एम.पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ हे दोन अंकी नाटक लोकांच्या आणि दिग्गजांच्या पसंतीस उतरलेले आहे. महाराष्ट्रभर ६५ प्रयोग सादर करत या नाटकाने रसिक प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेले आहे. अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेने ह्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट नाटक ‘आय.एम.पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ व सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून प्रशांत निगडे ह्यांना गौरविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नवी मुंबई शाखेनेसुद्धा घेतलेली आहे.

२५ ऑगस्टला विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,नवी मुंबई शाखेच्या वतीने १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे औचित्य साधून ‘सांस्कृतिक कार्यक्रमात’ मराठी नाट्यसृष्टीमधील नवी मुंबईतील ५ कलाकारांची निवड करून त्यांच्या करकीर्दीबद्दल सन्मान करण्यात आला. विठ्ठल प्रासादिक नाटय मंडळ गोठीवली, ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र वाडकर, रंगकर्मी वासंती भगत, संगीतगुरु पंडित सदानंद गोळे, नाटय-सिने लेखक, दिग्दर्शक व अभिनेता प्रशांत निगडे ह्यांचा गौरव करण्यात आला.

तरुण रंगकर्मी म्हणून प्रशांत निगडे ह्यांना गौरविताना मान्यवरांनी प्रचंड कौतुक केले. १०० वे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, अशोक हांडे, अ. भा. म. नाटय परिषद, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले, प्रमुख कार्यवाह संदीप जंगम, लोकप्रिय अभिनेत्री व बालरंगभूमी अध्यक्षा निलम शिर्के-सामंत, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, सतीश लोटके, नरेश गडेकर व इतर मान्यवर कलाकार उपस्थित होते. समारोपाच्या समयी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, प्रेमानंद गज्वी, अशोक हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार विजेते शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित ‘आय.एम.पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ ह्या दोन अंकी नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. अशोक हांडे ह्यांनी ह्या नाटकाचे जाहीर भाषणात कौतुक करत पुढील वाटचालीसाठी प्रशांत निगडे ह्यांना शुभेच्छा दिल्या!
ह्या सन्मानाने भारावून गेलेले प्रशांत निगडे म्हणाले,” हा सन्मान केवळ माझा नसून आतापर्यंत माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा आहे. कालासृष्टीत नवी मुंबईची मान उंचावताना माझे नाव या दिग्गजांच्या यादीत आल्याने मी भारावून गेलो आहे. आता जबाबदारी आणखीन वाढल्याची जाणीव झाली.

 

ऐन तारुण्यात हा सन्मान मला मिळाल्याने अजरामर कलाकृती हातून घडण्यासाठी प्रचंड बळ मिळाले आहे आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ हे दर्जेदार नाटक प्रशांत निगडे या कलाकाराने जन्माला घातले आहे. मी सुद्धा तसा नवी मुंबईकरच आहे. नवी मुंबईतील हरहुन्नरी कलाकार प्रशांत निगडेचा सन्मान होताना प्रचंड आनंद होत आहे.’ – ‘मराठी बाणा’ फेम अशोक हांडे’प्रशांत निगडे हा उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम अभिनेता आहे. त्याने निर्माता म्हणून उचललेली जबाबदारी ही कौतुकास्पद आहे. समाजभान असणाऱ्या या तरुण कालावंतांकडून अनेक सजग कलाकृती घडतील अशी खात्री आहे.’ – ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी.

‘अ. भा. म. नाटय परिषद, नवी मुंबईच्या यशस्वी वाटचाली नंतर बालरंगभूमीची वाटचाल नवी मुंबईत सुरू करत आहोत. प्रशांत निगडे सारखे तरुण कलावंत ही धुरा यशस्वीरित्या पेलवतील.’- अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष विजय चौगुले.

Related posts

अमरावतीचा यश अनिल वाकळे झी मराठी टिव्हीवरील ड्रामा ज्युनियर्स झळकतो

kalaranjan news

||स्तुति शिवरायांची ||

kalaranjan news

विरार येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी 

kalaranjan news