भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११वाजता मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील भगत यांचे घरी प्लांट नंबर २४२ ,रुम नंबर डी ४६ गणेश गल्ली, चारकोप कांदिवली पश्चिम या ठिकाणी धनगर समाज विकास मंडळाची वार्षिक सभा संपन्न झाली.सालाबाद या वर्षी धनगर समाजाचे स्नेहसंमेलन व वधू वर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने मंडळाच्या कार्यकारिणी मधील पदाधिकारी , सभासद, सदस्य व इतर समाज बांधव यांचे यांची वार्षिक सभा होऊन काही ठराव मंजूर करण्यात आले.मंडळाचा जमाखर्च, कार्यक्रमाची तारीख, वर्गणी,स्मरणीका छापणे, प्रकाशित करणे,मंडळात महिलाचा सहभाग करून घेणे, वरवधूची नोंदणी आन लाईन,आप लाईन नोंदणी करणे, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आप आपली जबाबदारी पार पाडावी,
प्रत्येक समाज बांधवाकडे वेगवेगळी कामे वाटून देण्यात आली,या प्रसंगी धनगर समाज विकास मंडळाचे प्रवक्ते भारत कवितके, कार्याध्यक्ष सुनील भगत, अध्यक्ष शिवाजी पिसे, उपाध्यक्ष महेंद्र काळे,सचीव नारायण पिसे खजिनदार मुकेश पिसे, आप्पासाहेब कुचेकर, संतोष पिसे,आनंदा भोजणे सतिश पिसे, भूषण एकल, संतोष ( दादा) पिसे,किरण चांगण,राजू कुचेकर, सदानंद लाळगे सर, राजा.राम कुचेकर व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते