कला पुरस्कार सांस्कृतिक

सहा.प्रा.भारजकर बी.टी. साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

साहित्य क्षेत्रात विख्यात कवी, लेखक,अलककार सहा.प्रा.भारजकर बी.टी. अंबाजोगाई यांची साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक अमृत महोत्सव गौरव समिती, महाराष्ट्र राज्य यांनी २०२४ चा साहित्यरत्न पुरस्कार डॉ.डेरीक एंजेल (नासा शास्त्रज्ञ) यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले.

प्रजासत्ताक अमृत महोत्सव गौरव समिती, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. बालासाहेब तोरस्कर वरिष्ठ साहित्यिक, मुंबई उद्घाटक डॉ. खंडू मावळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिति) स्वागत अध्यक्ष प्रो.नागेश हुलावले. (अध्यक्ष वर्ल्ड विजन इंस्टीट्यूट मुंबई) प्रमुख पाहुणे डॉ.जी.डी.यादव अध्यक्ष (राष्ट्रीय विज्ञान संस्थान) डॉ.डेरीक एंजेल (नासा शास्रज्ञ) डॉ. सुकृत खांडेकर. (दैनिक प्रहार संपादक) श्री. प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी) श्री. भानुदास केसरे, रामकृष्ण कोळवणकर, श्री राजेश कांबळे, तसेच डॉ.नॅन्सी अल्यबुकर्स हे मान्यवरांची उपस्थिती पार पडला.

मा.सहा.प्रा.भारजकर बी.टी.यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रकाशनाच्या वाटेवर असलेले काव्यसंग्रह ‘वेडी प्रेमात पडली’, ‘वास्तवाच्या रेषा’, ‘माय मराठी’, व हिंदी काव्यसंग्रह ‘दो गुलाब’, आणि इंग्रजी काव्यसंग्रह ‘My Charm’ व रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ वर प्रसारित होणाऱ्या (अति लघु कथा) इत्यादी साहित्य आम्ही मुंबईकर साप्ताहिक व दैनिक महाराष्ट्र साहित्य दर्पण मध्ये क्रमशः कविता प्रकाशित.

वेडी प्रेमात पडली या कवितेने प्रेमी मनाला अक्षरशः वेड लावले..

!!वेडी प्रेमात पडली!!”                                            आंब्याच्या झाडाखाली                                               चिंचा खाताना वेडी प्रेमात पडली”

या कवितेने महाराष्ट्रातील साहित्य रसिक मनाला खरोखर प्रेमात पाडून वेड लावले. प्रेम या विषयाला वाहिलेली विनोदी कविता उपस्थित मनाला आनंद देऊन गेली. आयोजक प्रमोद सूर्यवंशी, मा. श्री. योगेश पाटिल, योगेश हरणे, वैशाली पाखले व साहित्यिक रसिक यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा नॅशनल लायब्ररी बांद्रा, मुंबई येथे संपन्न झाला.

 

Related posts

ठाण्यात वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईच्या पहिल्या ”पसायदान” या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

kalaranjan news

कवी सरकार वाचनालय इंगळी आयोजित भोगावती येथे २० वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न 

kalaranjan news

स्कुल ऑफ स्कॉलर्स बिर्ला काॅलनीतील विद्यार्थ्यांनी साकारले सुंदर गणपती

kalaranjan news