अकोला प्रतिनिधी – बिर्ला काॅलनी स्थित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे पर्यावरणाचे भान राखत शालेय विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापीका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात शाळेचे कला शिक्षक योगेश विखे यांनी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन व नियोजन केले होते.
या कार्यशाळेचे विशेष म्हणजे ही कार्यशाळा घेण्यास जगातील वयाने सर्वात लहान मूर्तीकार पुर्वा प्रमोद बागलेकर उपस्थित होती. या लहानग्या पुर्वाने शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूमातीपासून सुबक,सुंदर मुर्ती घडविण्याचे धडे दिलेत.सदर कार्यशाळेत वर्ग 4 थी ते 6वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील इंग्रजी विषय शिक्षिका सुचिता खांडेकर, वैशाली अवचार व कला शिक्षक योगेश विखे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.