तितिक्षा इंटरनॅशनल आणि भारतीय विचारधारा आयोजित ‘कथा शिक्षणाची- प्रचिती ज्ञानदानाची ‘ या अंतर्गत तितिक्षा शिक्षणाचार्य पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रितांचे काव्य संमेलन आयोजित केले आहे. तितिक्षा ” शिक्षणाचार्य पुरस्कार २०२४” व “तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार २०२४” तसेच ” सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार कल्पकता रत्न पुरस्कार ” इत्यादी पुरस्कारांचे स्वरूप आहे.
दि. ५/०९/२०२४ रोजी पत्रकार भवन नवी पेठ मुख्य सभागृहात संपन्न होणाऱ्या समारंभात डॉ. न. म. जोशी,डॉ. निशिकांत श्रोती( कार्यक्रम अध्यक्ष) एडवोकेट शार्दुल जाधव, मंदाताई नाईक, प्रा. शरदचंद्र काकडे,डॉ. मधुसूदन घाणेकर, भारती महाडिक, प्रिया दामले इत्यादी मान्यवर सहभागी होत आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील सौ.वसुधा वैभव नाईक , प्रा. जयंत खेडकर, सौ. मेघना जोग, दीपा पराडकर, सुहासिनी दीक्षित यांना शिक्षणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.