कला पुरस्कार सांस्कृतिक

लेखिका सौ वर्षा फटकाळे वराडे ठाणे यांना प्रजासत्ताक अमृत महोत्सवानिमित्त साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य 2024 साठी ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिका सौ वर्षा फटकाळे वराडे यांना साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या ‘अश्वत्थ’ काव्यसंग्रहाला देखील तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.आजवर त्यांना अनेक ठिकाणाहून साहित्यिक योगदानाबद्दल 25 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

  या प्रसंगी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार 2024 समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, उद्घाटक ख.र. माळवे (महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्राध्यापक नागेश हुलावळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई) प्रमुख पाहुणे डॉक्टर जी. डी. यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था) डॉ.डेरिक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉक्टर सुकृत खांडेकर (दैनिक प्रहार संपादक) श्री प्रमोद महाडिक नॅशनल लायब्ररी आणि डॉक्टर नान्सी अल्यूकर्स इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 25 ऑगस्टला नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद सूर्यवंशी, रमेश पाटील, योगेश हरणे यांनी केले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related posts

Bigg Boss विजेते शिव ठाकरे याच्या घरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पा चे भव्य आगमन

kalaranjan news

पवित्रता, जीवन की बनाये रखना यही धम्म है!

kalaranjan news

बावन्न वर्षांनी भेटले मित्र जुन्या एस एस सी अकरावी स्नेह संमेलना निमित्ताने

kalaranjan news