अमरावती – प्रतिनिधी अमरावती, १५ ऑगस्ट २०२४: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे सुदर्शना फाउंडेशनच्या वतीने स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुदर्शना देशमुख आणि सचिव क्रांती देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला.
दरम्यान, नवी दिल्लीच्या गाझियाबाद येथील प्रताप विहार परिसरातही सुदर्शना फाउंडेशनच्या वतीने स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्ष संयुक्ता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्रताप विहार येथील बगीच्यात वृक्षारोपण करण्यात आले, ज्यामध्ये स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी फाउंडेशनने प्रताप विहारमधील शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारी पुस्तके वितरित केली. या उपक्रमामुळे भावी पिढीत पर्यावरणाच्या संवर्धनाची महत्त्वपूर्ण जाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.