चंद्रपूर – द ग्रीन भारत टाईम्स प्रस्तुत, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात, डाॅ. मंदा पडवेकर यांना १५ ऑगस्ट २०२४,च्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत “इंडीयन स्टार अवार्ड” बहाल करून गौरवान्वित करण्यात आले.
संघर्षातून स्वयंसिद्धा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या धनी डाॅ. मंदाताई पडवेकर यांना “इंडियन स्टार अवार्ड”राष्ट्रीय हितार्थ सेवेसाठी प्रदान करण्यात आला.या पूर्वी ही मंदाताईंना अनेक प्रतिष्ठावंत पुरस्कार प्राप्त झाले असून,”इंडियन स्टार अवार्ड” २०२४ हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने आप्त मित्र आणि समाजाच्या सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.