कला पुरस्कार शैक्षणिक सामाजिक

महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनलच्या संपादिका सौ. जान्हवी भोईर यांना साहित्य रत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान

कवयित्री,परिचारिका,पत्रकार, संपादिका जान्हवी भोईर आजवर विविध पुरस्काराने सन्मानित

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी नवीमुंबई, नेरुळ येथील प्रसिद्ध कवयित्री,परिचारिका, पत्रकार, तसेच महाराष्ट्र वेदभुमीन्युज चॅनलच्या संपादिका यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक गौरव पुरस्कार २०२४.ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले…

साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई बांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड, एस व्ही रोड येथे २५ ऑगस्ट २०२४ ला कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ लेखक बाळासाहेब तोरस्कर, लेखक कवी डॉ खंडू माळवे मुंबई, पद्मश्री  पुरस्कारविजेते डी. जी. यादव, भानुदास केसरे, प्रमोद महाडिक, डॉ. सुकृत खांडेकर, राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अल्बुकर्क, रामकृष्ण कोळवणकर, डॉ. रेडिक एंजल्स, आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

या वेळी मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी मा. नागेश हुलावळे संस्थापक, वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबई, नॅशनल लायब्ररी, डी. पी. ई. सोसायटी, बांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर, प्रमोद सूर्यवंशी मुंबई, योगेश हरणे पुणे, व आयोजक समितीचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते

✒️ जाहिरात. बातमी. लेख व कविता साठी संपर्क 9226198299 ---------------------------------------

Related posts

“अमरावतीत रुद्राक्ष संस्थेच्या दहीहंडी उत्सवाने रंगवली गोकुळाष्टमी, सुरम्य सांस्कृतिक प्रदर्शनाने आनंदाची लहर”

kalaranjan news

ओम वैष्णवी वन्नेरे निर्मित ‘काटा’ या मराठी चित्रपटासाठी अकोला येथील आनंदी गुरुकुलच्या सहा विद्यार्थी कलाकारांची निवड

kalaranjan news

पालावर घडतोय दीपावली अन्नदान महोत्सव

kalaranjan news