कवी लेखक संजय निकम यांना साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानीत
मालेगाव : येथील राष्ट्रीय कवी व लेखक संजय मुकुंदराव निकम यांना राज्यातील प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीतर्फे साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. श्री. निकम यांच्या मेरा भारत या पुस्तकातील कवितांची निवड झाली. त्यांची प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार देण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली. संजय निकम यांना मुंबई येथील नॅशनल लायब्ररी सभागृह वांद्रे येथे रविवारी (ता. २५) पदमश्री जी. डी. यादव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागेश हुलाळे, लेखक व कवी डॉ. खंडू माळवे, भानुदास केसरे, प्रमोद महाडीक आदी उपस्थित होते. श्री. निकम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.