पुरस्कार शैक्षणिक

एवरेस्ट अबॅकस अकॅडमीची उंच भरारी

 

एवरेस्ट अबॅकस अकॅडमी कडून 28 व्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी देशमुख लाॅन अमरावती येथे नुकतेच पार पडली. या कार्यक्रमासाठी अमरावती विद्यापीठाच्या उपकुलसचिव मा. सौ. मीनल मालधुरे, उपआयुक्त मा श्री. विजय राहटे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मा. श्री. श्रीकांत उमप, ॲडव्होकेट मा. प्रवीण भूस्कुटे, मा. प्राचार्य शिवदास आढाव, नायब तहसीलदार मा. श्री. राजेश चौधरी, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर मा. श्री. संदीप बोडखे, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. विशाल रोकडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे श्री अशोकराव घडेकर हे होते. संपूर्ण विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमधून 2130 विद्यार्थी स्पर्धेला बसले होते. सकाळी नऊ वाजता विदर्भातील सर्व विद्यार्थी देशमुख लाॅन येथे उपस्थित झाले. विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर लगेचच सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. विशेष म्हणजे ही परीक्षा फक्त पाच मिनिटांची होती. अकॅडमीच्या कार्यतत्पर शिक्षकांनी लगेच पेपर तपासून विद्यार्थ्यांचा निकाल बनवला. तीन वाजता पारितोषिक वितरण झाले. कौतुकाची गोष्ट म्हणजे सकाळी 10 वाजता 2130 विद्यार्थ्यांची परीक्षा झाली. अवघ्या तीन तासांमध्ये शिक्षकांनी पेपर तपासले व लगेच निकाल बनवून पारितोषिक वितरण झाले. या परीक्षेत पहिलीच्या विद्यार्थ्यानी पाच मिनिटात 150 पेक्षा जास्त बेरीज, वजाबाकी गुणाकार भागाकार केले. ईश्वरी शेखर , शौर्य बंड , सृष्टी ठाकरे, भक्ती नैनानी, संस्कृती केंद्रे , मधुरा सुलताने, गौरांग आके, खिलन शहा या विद्यार्थ्यांना अबॅकस मास्टर पदवी अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव सौ. मीनल मालधूरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. पेपर तपासणी होईपर्यंत मधातल्या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गायन ,नृत्य ,पोवाडा सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची एकूण दहा वेगवेगळ्या सेंटरवर स्पर्धा झाली. सर्व सेंटर मिळून 9300 विद्यार्थी स्पर्धेला बसले होते. अबॅकसमुळे फक्त विद्यार्थ्यांची गणिताची गती वाढत नाही तर त्यासोबतच एकाग्रता ,स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढीस लागून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक लेवल मध्ये वाढ होते. भारतामध्ये एकमेव अशा एव्हरेस्ट अकॅडमी मध्ये बोटांवर अबॅकस शिकवल्या जाते. अबॅकस ची पार्टी म्हणजेच कॅल्क्युलेटर सोबत असो अगर नसो तरी सुद्धा विद्यार्थी कुठेही बसून केव्हाही बोटांवर गणितं सोडवितात हे या अकॅडमीचे वैशिष्ट्ये आहे.

या स्पर्धेमध्ये डॉ. अश्विनी मडघे यांच्या पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये पार्थ डांबरे या विद्यार्थ्यांनी 152 गुणाकार करून चॅम्पियन ठरला तर 123 बेरीज वजाबाकी करून मानधा सांभारे हिने चतुर्थ क्रमांक पटकाविला. तसेच आराध्य देशमुख, अश्मित दरणे, सान्वी अजमिरे, आराध्या बेलोकर यांनी 90 पेक्षा जास्त बेरीज वजाबाकी करून एक्सीडेंट ची ट्रॉफी मिळविली. अर्णव बोबडे, सर्वज्ञ मेहरे, श्रेयांश बेलोकर, शाश्वत मडघे, प्रथमेश स्वर्गे, अर्चित सावदे, आरोही मेश्राम, गौरव गुल्हाने, देविका तरारा यांनी 60 पेक्षा जास्त बेरीज वजाबाकी गुणाकार करून बेस्ट ची ट्रॉफी मिळविली. ही कॉम्पिटिशन यशस्वी होण्यामध्ये विद्यार्थ्यांची ची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांची सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालनासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. श्री. अमोल बागुल यांना अहमदनगर येथून आमंत्रित करण्यात आले होते. बागुल त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध सूत्रसंचालनाने विद्यार्थी व पालकांना मोहित केले. आभार प्रदर्शन प्राजक्ता व-हेकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts

कळझोंडी शाळा नंबर – 2 गाणसुरवाडी येथे छ.शिवाजी महाराज जयंती साजरी

kalaranjan news

प्रथम पुरस्काराच्या मानकरी प्रतिक्षा मांडवकर यांच्या कवितेने दिला “माणूस हा माणुसकीच्या धर्मात बरा आहे” हा  संदेश 

kalaranjan news

रत्नागिरीची कन्या ‘सोनाली जाधव’ने पटकावला मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५ चा ‘किताब’

kalaranjan news