पुणे – प्रतिनिधी वर्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलावडे, आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे संपादक श्री. प्रमोद सुर्यवंशी, काव्यसंस्था पुणे यांचे संपादक श्री. योगेश हरणे यांच्या सौजन्याने विख्यात कवयित्री, साहित्यिका, लावणीकारा सौ. सरोज सुरेश गाजरे भाईंदर ठाणे मुळ गाव जळगाव खानदेश यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ” जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव” हा पुरस्कार प्रदान करून गौरवान्कित केले गेले.
मुंबई, बांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड येथे २५ ऑगस्ट २०२४ रोजी विख्यात साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.