परतवाडा – प्रतिनिधी
गुरुकुल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष रविंद्र गोळे यांच्या मार्गदर्शनात आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते पूजन करून दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. यामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका . राधिका चौधरी, उप मुख्याध्यापिका . अनघा भारतीय उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले जसे वेशभूषा, मोरपंख, बासुरी,पाळणा सजावट इत्यादी. प्रमुख अतिथींनी प्रदर्शनाचे अवलोकन केले विविध नृत्यकलेचे आयोजन . लीना हिरपूरकर यांनी केले. कृष्णजन्माष्टमीचा कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न करण्यात समितीमधील ..देवरे, .कडू, .रावळे यांचे विशेष सहकार्य लाभले. दहीहंडीच्या कार्यक्रमाकरिता सर्व पुरुष शिक्षक वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष आभार मानले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष रवींद्र गोळे यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद सुवर्णा बुटे ,.संगीता तायडे,.आरती तायडे आणि . पर्वतकर सर यांनी भूषविले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी गोपाळकाला बनवण्यासाठी साहित्य आणले व विद्यार्थी शिक्षकाच्या मदतीने गोपाळकाला बनवण्यात आला.अशा प्रकार हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यामुळे मुख्याध्यापिका राधिका चौधरी, उपमुख्याध्यापिका .अनघा भारतीय यांनी कार्यक्रम उत्साह संपन्न झाल्यामुळे विशेष आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी उपस्थित होते