जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले, इथल्या शोषित, पीडित, वंचित समूहावर अन्याय झाला तेव्हा तेव्हा इथं एका नायकाचा जन्म झाला आहे. हजारो वर्षापासून पिचलेल्या, ग्रासलेल्या आणि चातूरवर्ण व्यवस्थेनुसार अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला महामानव प्रकांडपंडित, बुद्धिसम्राट, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या प्रवाहात आणून त्यांची गुलामीची बिडी तोडून बाहेर काढले बाबासाहेबांनी या देशासाठी या समाजासाठी किती त्याग केला, संघर्ष केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे.. परंतु या समाजाने त्यांना काय दिले जेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारू तेव्हा आपल्या कडे काय उत्तर असणार आहे..? जेव्हा 1947 ला आपला भारतदेश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला आणि 1950 ला या देशाला संविधान लागू झाले आणि देश प्रजासत्ताक झाला. स्वातंत्र्य – प्रजासत्ताक झालेल्या देशात मात्र शोषित,पीडित, वंचित, दलित समूहावरचे अन्याय आत्याचार मात्र त्याच मोठ्या प्रमाणात, देशाला स्वातंत्र्य होऊन जेव्हा 25 वर्षे होतात तेव्हा 1970 च्या दशकात विरयोद्धा पँथर राजा ढाले एका साधना साप्ताहिकात एक दहाक लेख लिहितात कि ज्या देशात महिलांचे अब्रू झाकल्या जात नसतील तर त्या देशातील तिरंग्याचा काय उपयोग..? तिच्या साडीचा कापड आणि तिरंग्याचा कापड हा वेगवेगळा आहे का..? तेव्हा या लेखाची प्रचंड चर्चा होऊ लागते, कारण हा फक्त लेख नव्हता तर हा आवाज होता, आवाज समतेचा, आवाज ऐकतेचा, आवाज संघर्षाचा, आवाज अन्यायाविरुद्धचा आणि याच आवाजातून इथं उभी राहते ती दलितांच्या आवाजाची, संघर्षाची चळवळ, एक अशी चळवळ जी फक्त लढायला शिकवते अन्यायाविरुद्ध उभ राहायला शिकवते, आणि सुरु होतो इथल्या प्रस्तापित व्यवस्थेविरुद्ध समतेचा एल्गार.. पँथर पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वी. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर, गंगाधर गाडे, रामदास आठवले आणि इतर बाकी सर्व कार्यकर्ते.. मित्रांनो 1970 च्या दशकात याच तरुण कार्यकर्त्यांच्या विचारातून, आवाजातून अकोला जिल्ह्यातील रिधोरा या गावातील नायक, भीमयोद्धा, पँथर, वस्ताद “दिलीप दंदी ” नावाचा तरुण पेठून उठतो , समाजावर होत असलेल्या अन्यायाची आग त्याच्या डोळ्यात दिसते,मायबहिणींच्या अन्याय अत्याचाराची किंचाळनी त्याच्या कानात गुंजते, दिवसा ढवळ्या जातीच्या नावावर केलेल्या माझ्या समाजातील भावांच्या कत्तलीची न्यायाची हाक त्याच्या आवाजातुन येते आणि मग हाच तरुण आपला परिवार दूर करून, जगायचं तर फक्त समाजासाठी आणि मरायचं तर फक्त समाजासाठी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून घराच्या बाहेर पडतो, समाजातील लोकांवरील आत्याचार थांबला पाहिजे म्हणून हातात तलवारी घेऊन दुश्मणांच्या नरडीतला रक्ताचा घोट पेत, समाजाचा पहारा देतो. जिथं होईल अन्याय तिथं उभा राहतो, आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येकाच्या मनात स्वतःच नाव कोरतो, माझ्या समाजातील लोक हे सुरक्षित राहले पाहिजे, त्यांनी आपआपसात एकोपा जपला पाहिजे म्हणून त्यांना एकत्र आणण्यासाठी झटत असतो, बाबासाहेबांनी संघटित होण्यासाठी सांगितले तो संघटित माझा समाज असला पाहिजे म्हणून आपल्या धारदार वाणीतून प्रबोधन करतो, रंजलेल्या, गांजलेल्या, लोकांना चळवळ काय असते आणि त्यासाठी काय योगदान द्यावे लागते हे शिकवतो, आपलं अख्ख आयुष्य हे चळवळीसाठी दान करतो, मात्र प्रसिद्धी पासून राजकारनापासून दूर राहून अंधारातुन चमकतो, माणूस द्या मज माणूस द्या, या तुकडोजी महाराजांच्या विचारातून माणूस शोधतो पण त्यांना तो माणूस सापडत नाही तेव्हा याच चळवळीची आजची दशा आणि दिशा बघून संतप्तो, समाजातील दलाल बघून चिडतो, कारण चीड येन ही जिवंत माणसाची लक्षण आहेत.. ज्या समाजासाठी मी रात्रीचा दिवस करत, वेळप्रसंगी जंगलात राहून दिवस काढले, कधी प्यायला पाणी नाही तर कधी खायला भाकरीचा तुकडाही नाही.जे दिवस मी काढले ज्यांना चळवळ शिकवली, ज्यांना लढायला शिकवलं, ज्यांच्यासाठी हे जीवन वेचल, हे शरीर झीजवलं ते मात्र आज खुशाल आपलीच माडी, आपलीच गाडी अन आपल्याच बायकोची गोलगोल साडी या मध्येच गुरफटलेले दिसतात, समाजाला दूर करून स्वतःचेच पोट भरून खुशाल जगतात, अरे त्या बाबासाहेबांची तरी जान असू द्या ज्यांनी तुमच्यासाठी स्वतःची बायको लेकरं दूर केले, पोटची लेकरं दूर करून तुम्हाला मायेन कुरवाळलं, आज बाबासाहेबांच्या मुळे तुमच्याकडे पद आले , प्रतिष्ठा आली पण स्वतःपुरता विचार करून तुम्ही ते फक्त खिसा भरण्यासाठी वापर केला ही समाजाची अवस्था बघून प्रचंड चिडतो, रडतो कारण समाजाचं काहीतरी देण लागतं हे कुठंतरी समाज विसरत आहे. देशातील एकंदरीत राजकारण, समाजकारण बघून तडफडतो..आजही त्यांच्या डोळ्यात तीच आग दिसते, तोच दमदार आवाज, तीच ताकद आहे, पण मनात अनेक जखमा झालेल्या आहेत आजची समाजाची दशा बघून..! जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे, कारण एवढं सार करूनही हा नायक कधी प्रसिद्धीच्या मागे हापहापला नाही, कधी स्वतःचा मोठेपणा केला नाही, अंधारात जसा काजवा चमकतो, कोळष्याच्या खाणीत जसा हिरा चमकतो अगदी तसच तो चमकत राहिला, परंतु समाजानेही त्यांची पाहिजे तशी दखल घेतली नाही, ही शोकांतिका आहे.. परत प्रश्न पडतो कि एक समाजाचा घटक म्हणून आपण यांना काय दिले..?
आदित्य सुहास इंगळे
मोबाईल – 8767823022
मु. पो. निमकर्दा, ता. बाळापूर जि. अकोला
शिक्षण : बी. ए. द्वितीय वर्ष विध्यार्थी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद