श्रावण सर
बरसे चोहीकडे
वाजी चौघडे
श्रावण सर
पडते रानी वनी
होहो पानो पानी
श्रावण सर
करते ओलीचिंब
भिजतो लिंब
श्रावण सर
निळ निळ आकाश
वीज प्रकाश
श्रावण सर
घाले भोवती पिंगा
ओढ्याचा दंगा
श्रावण सर
इंद्रधनूचा पट्टा
हिरव्या वाटा
श्रावण सर
मयुर करी नृत्य
निसर्ग नित्य
श्रावण सर
सावळ्या ढगातून
कोवळ ऊन
श्रावण सर
सुखावे बळीराजा
आनंदी प्रजर

previous post