तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर भजन स्पर्धा न स्पर तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर, महाल येथे श्रावण मासानिमित्त नागपुरातील महिला- – पुरुष भजनी मंडळांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन २४ व २५ • ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मधुरा गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विश्वमांगल्य सभेच्या शिक्षा, धर्म, संस्कृती संयोजिका डॉ. राधा कमाविसदार, प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रवीण दटके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भजन हे ईश्वरप्राप्तीचे आणि आपल्या सांस्कृतिक परंपरा, वारसा जोपासण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, असे उद्गार डॉ. राधा कमाविसदार यांनी काढले. याप्रसंगी मधुरा गडकरी यांनी सर्व मातृशक्तीला भजन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
एकूण १८१ मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यातील ११ उत्तम भजनी मंडळांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार, १ सप्टेंबरला होणार असून बक्षीस वितरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. विजेत्या ११ भजनी मंडळांना भव्य रोख पुरस्कार, गौरवचिन्ह व गौरव पत्र आदी प्रदान करण्यात येणार आहे. कल्याणेश्वर येथील स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांचे असून आयोजन समितीत बानाबाकोडे, गुणवंत पाटील, पिंजरकर, काटोले, रेखा निमजे, श्वेता निकम भोसले, विलास सपकाळ आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.