डोळ्यांतील स्वप्ने डोळ्यांत राहिली
आठवणीतील तू ही आठवणीत राहिली
स्वप्नांच्या दुनियेतील तु स्वप्नांच्याच दुनियेत राहिली
जी तू नि मी सोबत पाहिली…..
ह्याच उद्यासाठी का मी पुष्पे ही देवास वाहिली
का झाली नाही तु माझी अविभक्त सावली
का मी गीते तुझ्यासाठी मधुर गाईली
जी तू नि मी सोबत सहृदय ऐकली….
हृदयास होते वेदना अगणित सुयांची काहिली
हृदयात नि तु आता चिरंतर राहीली
तुझ्याच साठी मी जीवन यात्रा नवी आरंभिली
जी तु नि मी कधी सोबत होती ना आरंभिली…
कवी ✒️ रविकांत विश्वनाथ खडस