नाशिक – प्रतिनिधी
२२.८.२४ गुरुवार रोजी नाशिक येथे लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मातंग हुदय सम्राट विष्णू भाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. बरेच काही निर्णय घेण्यात आले व कैलाश दादा खंदारे यांनी आव्हान केले की इथुन आपल्या शहराला, गावाला गेल्यावर जो न्यायालयाने ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे एसी, एसटी यांचे वर्गिकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार दिला त्या निमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात यावा तसेच कोर्टाच्या निर्णयाचा विरोध करीत असेल किंव्हा अवहेलना करीत असेल
अस्या पक्षाचा व नेत्यचा निषेध नोंदवावा.असे लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री कैलाश दादा खंदारे यांनी समस्त समाज बांधवांना सांगण्यात आले.नागपुर जिल्हा येथुन नाशिकच्या मेळाव्यात सहभागी झालेले सन्माननीय श्री गजानन बावणे प्रदेश उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य, यांच्या नेतृत्वाखाली श्री अंकुश बावणे विदर्भ सरचिटणीस,सौं.दिपाली वानखडे लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या, श्री सागर भाऊ जाधव विदर्भ उपाध्यक्ष, श्री पंकज भाऊ जाधव अमरावती जिल्हा अध्यक्ष, श्री रमेश पाडन अध्यक्ष नागपूर शहर, श्री नितीन भाऊ वाघमारे अध्यक्ष कोरकमटी नागपूर शहर, श्री अनिल पोटफोडे अध्यक्ष हिंगणघाट विधानसभा वर्धा,श्री सुशिल भाऊ बावणे अध्यक्ष वाडी शहर नागपूर, श्री निवृत्ती वानखडे साहित्य भुषण अन्नाभाऊ साठे स्मारक समिती कोषाध्यक्ष, श्री अनिल बावणे जिल्हा संघटक, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री एन.पायघन, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बावणे, सचिव श्री दिपक जाधव, उपस्थित होते नाशिक लहुजी शक्ती सेना मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.