कला सामाजिक सांस्कृतिक

कार्य गौरव पुरस्काराने विजया (विद्याताई ) वाघ होणार सन्मानित

उमरगा येथील साप्ताहिक विश्वनायकाच्या वतीने दुसरा वर्धापन दिन उमरगा या ठिकाणी संपन्न होत आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र लोकविकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर,आमदार ज्ञानराज चौगुले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साप्ताहिक विश्वविनायकाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विशेष कार्य करणाऱ्या सात मान्यवरांना मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये समाजसेविकाना विद्याताई वाघ यांना मानाचा कार्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

1991 पासून 2024 पर्यंत तहयात महाराष्ट्र लोकविकास मंच आणि समाज विकास संस्थेच्या माध्यमातून महिला,मुलं,दलित,शेतकरी, विधवा,परित्येक्ता अनाथ मुलं,युवकांसाठी प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी मदत, भूकंपग्रस्त लोकांच्यासाठी मदत,महाभयंकर दुष्काळ आणि कोविड सारख्या महामारी मध्ये त्यांनी लोकांना जतन करण्याचं काम केलं.सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमध्ये एक वाटसरू म्हणून त्यांनी आयुष्याचे समर्पण केलं आहे.

Related posts

मा. कु. सायली बाळू ढेबे यांना महाराष्ट्र स्टार गौरव पुरस्कार प्रदान

kalaranjan news

विल्ये रत्नागिरी येथे माता सावित्रीमाई फुले आणि माता रमाई जयंती उत्साहात

kalaranjan news

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

kalaranjan news