नांदेड येथील दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा 14 ते 16 ऑगस्ट तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य महोत्सव कला महोत्सव डॉक्टर सानवीजेटवानी यांनी सप्तरंग महोत्सव नुकताच संपन्न झाला या मधील अमरावती येथील नुपूर डान्स अकॅडमी संचालक प्रकाश मेश्राम यांच्या तब्बल 35 विद्यार्थिनींनी या राष्ट्रीय कला महोत्सवात भाग नोंदवला होता त्यापैकी 31 विद्यार्थिनींना यश प्राप्त झाले यामध्ये कथक नृत्य शास्त्रीय नृत्य तसेच लोकनृत्य उपशास्त्री नृत्य आणि महाराष्ट्रातील पारंपरिक लावणी् नृत्य मुलींनी सादर केले होते या संपूर्ण यशाचे श्रेय पालक आपल्या मुलींच्या गुरूंना श्री प्रकाश मेश्राम यांना देत आहेत
अमरावती इथे दस्तूर नगर आणि गाडगे नगर या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमी या नावाने या नृत्याकडेमीचे क्लासेस चालतात या अकॅडमीत शास्त्रीय नृत्य कथक तसेच लोकनृत्य उपशास्त्रीय नृत्य आणि महाराष्ट्रातील पारंपारिक लावणी चे प्रशिक्षण श्री प्रकाश मेश्राम हे आपल्या विद्यार्थिनींना देतात आज संपूर्ण अमरावतीकर या नृत्याकडेमीच्या विद्यार्थिनीचे कौतुक करत आहेत