सामाजिक

“बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे.या निंदनीय घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.

अमरावती प्रतिनिधी 

 राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली ,नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे.आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातही अशा घटना घडत आहेत. त्याची नोंद कोणी घेत नाही,

एफआयआर दाखल करायला विलंब लागतो .. आता समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे ? राज्यकर्ते आणि प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही,महाराष्ट्राला लज्जा आणणाऱ्या या घटनेची तत्परतेने चौकशी होऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे.

सुनील खराटे
ज़िल्हाप्रमुख , शिवसेना , अमरावती

Related posts

||स्तुति शिवरायांची ||

kalaranjan news

अमरावती जिल्ह्यात सुदर्शना फाउंडेशनचा स्वतंत्र दिन साजरा: चांदूर रेल्वे येथे वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती उपक्रम

kalaranjan news

काळोखाच्या अंधारातील प्रकाश “पँथर वस्ताद दिलीप दंदी”

kalaranjan news