कला सांस्कृतिक

अमरावतीचा यश अनिल वाकळे झी मराठी टिव्हीवरील ड्रामा ज्युनियर्स झळकतो

अमरावती प्रतिनिधी 

सरस्वती विद्यालय विद्यापीठ काॅलनी, एम.आय.डी.सी. रोड, अमरावती येथील विद्यार्थी यश अनिल वाकळे झी मराठी टिव्ही चॅनेल वरील ड्रामा ज्युनियर्स या रियालिटी शो मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून 16 धडाकेबाज स्पर्धेकांची ड्रामा ज्युनियर्स या रियालिटी शो साठी निवड झाली या 16 धडाकेबाज स्पर्धकांमध्ये यश अनिल वाकळे याची निवड झाली आहे. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून अमृता खानविलकर मॅडम व संकर्षण कऱ्हाडे सर तसेच एंकरिंग श्रेया बुगडे मॅडम करीत आहेत. ड्रामा ज्युनियर्स हा शो झी टिव्हीवर दर शनिवार व रविवार 9.00 वाजता सुरू होतो.

या मध्ये आपल्या अमरावती शहरातील यश अनिल वाकळे हा आपला अभिनय सादर करणार आहे. यश ने आधी राज्य स्तरीय बालनाट्य स्पर्धा, युवा नाट्यस्पर्धा व इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय व्दारा आयोजित 20 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा 2023-24 अमरावती केंद्रात 51 बालनाट्य सादर झाले होते.

त्यामध्ये धनंजय सरदेशपांडे लिखित सिद्राम सुडोकु या बालनाट्यातील अभिनयासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात उत्कृष्ट अभिनय रौप्य पदक यश अनिल वाकळे यास मिळाले.आपल्या या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय काळबांडे सर व संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच आई वडील व आप्तस्वकीय मिञ परिवारास देतो.

यश च्या पुढील वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा.

 

Related posts

महाराष्ट्राचा हास्यकवि स्पर्धेत ग्रामीण हास्यकवी श्रीराम घडे यांचा प्रथम क्रमांक

kalaranjan news

दोस्ती फाउंडेशनचे गौरव 2024 पुरस्कार जाहीर 

kalaranjan news

साहित्यिक भारत कवितके यांनी पंढरपूर येथील उपोषण कर्त्या धनगर बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

kalaranjan news